कसे लपवू...

कसे लपवू
तू दिलेले सोनेरी, सुगंधी क्षण?
जे चकाकतात
गर्द अंधारात आणि लख्ख प्रकाशातही!
गंधाळतात
वेळे काळाचं भान सोडून.....
तकाकी लपत नसते अन्
सुगंधाला चहाडी करण्याची खोड असते,
..... ठाऊक होतं ना तुला?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments