विक्षिप्त

"ती विक्षिप्त होती"
शेरा लिहून
तू तिची केस
बंद केलीस,
बाजूला सरकवलीस..
तुझ्यातला डॉक्टर
प्रियकारापेक्षा
अधिक सजग
ती निव्वळ
प्रेयसी उरलेली..
तुझ्याकडे
केस बंद केल्यानंतर
सरळ दुस-या पेशंटला
तितक्यात अविचल
भावाने तपासायला घेतात
हे तिला उमजून यायला हवं होतं

आता काय उपयोग
एक पर्व
काही पानांमध्ये कायमचं
बंदिस्त झालंय
त्यावरचा शेरा
दुरुनही ठळक दिसतोय

-बागेश्री

Post a Comment

0 Comments