नमस्कार

दक्षिण- उत्तर
टोकाचे दोन धृव
स्वतःत सामावून
संचारत असतो आपण
ह्या उघडबंब ग्रहावर..

ज्या ज्या क्षणाला ही टोके जोडली गेली आहेत
त्या क्षणाला आतलं द्वंद्व थांबलं आहे
पृथ्वी शांत झाली आहे

नमस्कारात फार मोठी ताकद असते

-बागेश्री

Post a Comment

0 Comments