ओढ

"जरा हात पुढे कर
हा इतका शब्द ठेवून घे...
ह्या शब्दाच्या संवेदनेची थरथर,
तुला जाणवत राहील
तोवर सारं आलबेल..."

त्याला काही कळण्याआधी,
ती गेलीही!
...त्याने अलवार मूठ उघडली
तिला हाताळतो
तितक्याच हळुवारपणे
शब्द हाताळला
शुन्यात नजर गुंफत
तोच शब्द मनाशी आळवत राहिला
         "ओढ"

तिच्या ओढीची
अनामिक लहर
त्याच्या सर्वांगातून
वाहत राहिली

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. ओढ ही अनामिक लहर....नाव तर दिलेलं आहे...ओढ...मग ती अनामिक कशी?....ती अनामिक कारण ती ओढ आहे....तिची....जिला नाव नाही-गाव नाही....आणि अस्तित्वही नाही....ती फक्त आहे....आदीपासून अंतापर्यंतची कृष्णाच्या विभूती तत्वाची...पुरुष ह्या संवेदनेची...स्त्रीच्या सृजनशील तत्वाशी गुंफलेली...एक गाठ.

    ReplyDelete