मृदगंध

तू अतीव मायेने
चेह-यावरून हात फिरवलास
माझा कोरडा श्वास, तुझ्या हातावर पडला
तुझी प्रेमळ नजर पाहत राहिली मला, आरपार
अन् दूरपर्यंत तुला फक्त दुष्काळ दिसला...!

तू कुशीत घेतलंस मला,
करत राहिलीस माया
माझ्या रंध्रांतून वाफा उठत राहिल्या
तू थोपटत राहिलीस...

थोपटत राहिलीस
आणि स्वतःच निजलीस, आई!
मी न्याहाळत होते तुला
आणि
जाणवलं मला की
कित्येक वाळवंटे ओलांडून तू
उभी आहेस
तरीही शांत आहेस
पूर्ण आहेस!
बघता बघता
डोळे भरून आले
अन्
गालांवचा मृदगंध हवेत विरत राहिला!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. धरित्रीचे हे एक छानसे अलगुज आहे..."तू कुशीत घेतलंस"..मेघ हा तिचा सखा...पण मातृत्व घेऊन येतो..."थोपटत राहिलीस....आई "....आणि मग "बघता-बघता" मेघाची मातृमय करुणा दाटून आली...मेघ बरसला आणि धरित्रीच्या "गालावरचा मृदगंध हवेत विरत राहिला..." बागेश्री,तुला जी अनुभूती येत आहे...मातृत्वाच्या उर्मींची....ती मेघदूताच्या यक्षासारखी आहे....खरंच हे अंतरात बीजरूपाने साद घालत आहे ना?....की नुसते भास होत आहेत? नक्कीच भास नाहीत ना? अभिनंदन करू का?

    ReplyDelete