दिलासा

त्याने हळूच एक दिलासा तिच्याकडे सरकवला
खजिना मिळाल्याच्या आनंदात
तिने तो अलगद उचलला
घडी घालून पर्समध्ये ठेवला

आता घराच्या कोप-यात
गर्दीच्याही ठिकाणी
रात्री झोपण्याआधी
ती तो हळूवार
काढून बघते
स्वप्नांमध्ये हरवून जाते

'काही दिवसांची निश्चिन्ती' म्हणत
सुटकेचा श्वास टाकून तो ही गाढ झोपतो

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. दिलासा हा शब्द...ह्यातच देण्याचा भाग आला.पण तो कसा आला?आभासी. आणि खर तर दिलासा म्हणजे एक प्रकारचे सांत्वन..एक कप्पा उगाचच आरामदायी वाटणारा... म्हणूनच बागेश्री म्हणते "स्वप्नामध्ये हरवून जाते"...एक टांगलेला जीव आहे...आंदोलित आहे..पण हा दिलासा असल्यामुळेच आणि ती वास्तवाचे भान विसरलेली नाही,म्हणून म्हणते "काही दिवसांची निश्चिंती"..."दिला का खिलोना है, ये दिलासा" पण ती "हाय,टूट गया " म्हणत रडत बसणारी नाहीयेय...कारण ती असे खिलोने, दिलासे "घडी घालून पर्स मध्ये ठेवला"असे म्हणून निश्चिंत होणारी आहे.आपल्या संयमाचे बांध फुटू न देणारी सोशिकतेची असोशी तिच्या खंबीर स्वभावात आहे.
    ह्या कवितेत एक स्त्री आहे की जिच्यात वास्तवाचे नुसते भान नाहीयेय,त्याला जपूनही, हळवेपणाने उसासे टाकणे नाहीयेय.ही स्त्री द्रौपदीचा वारसा घेऊन वास्तवाशी दोन हात करणारी सौदामिनी आहे...
    ह्या कवितेतून बागेश्री आता स्त्री ह्या अभिव्यक्तीचा चिंतनात्मक विचार मांडू लागली आहे.तिच्यातीलच नव्हे तर अवघ्या स्त्रीचा आदर्श ती मार्गदर्शित करीत आहे.

    ReplyDelete