भेट

तू म्हणालास
'बास, आता काही श्वासांचंच अंतर!'
मी निकराने तग धरला
एक- एक श्वास मोजित राहिले..
दरम्यान
बरीच युगं गेली
एका भेटीसाठी 
किती जन्मांचं अंतर कापावं लागतं, कान्हा?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments