हिरवाई

शेवटी फार ताणू नये म्हणून
तिने नात्याला घडी घातली
सुरक्षित ठेऊन दिलं
पुढे कधीतरी त्यानेच घडी मोडली
तिच्यासमोर धरलं
घडी घातलेल्या जागा
अजूनही हिरव्या होत्या
तिने एक फुंकर मारली
आणि बहर परतून आला
बघता बघता
डोळ्यांना पालवी फुटली...

कधी कधी जरासं अंतर पडू द्यावं
मग फुंकरीलाही अर्थ येतो आणि
....नात्यालाही!

Post a Comment

0 Comments