Rio

रिओमुळे भारतासारख्या पुरुषप्रधान देशाच्या डोळ्यांत (काही काळापूरतं तरी) जळजळीत अंजन लागलंय. शिवाय स्त्रीभृण हत्येत वरचा नंबर लागणा-या ह्या देशाला एकाएकी 'स्त्री' बद्दल जो काही कळवळा निर्माण झालाय तो पाहून गम्मत वाटतेय. गम्मत ह्यासाठी की तिला तिचं कसब, तिचं सत्व इथे कायम सिद्ध करावं लागतं. तेव्हा कुठे पुरुषप्रधान संस्कृतीच्या डोळ्यांवरची झापड काही काळासाठी बाजूला सरते. (एक फार लहान सुसंस्कृत वर्ग जो तिला कधीच कमी लेखत नाही, तो अपवाद)

  गम्मत ह्याहीसाठी की, तिच्या नैसर्गिक धर्मावरून तिला देवदर्शनासारख्या शुल्लक गोष्टीसाठी विरोध करणारे आणि तिचं कर्तब पाहताच भारावून तिचे गोडवे गाणारे लोक इथेच बघायला मिळतात
अगदी समूहाने तिची लाज उतरवून घेणारे आणि आज भारताची लाज तिनेच राखली म्हणणारे पण इथेच आहेत

त्यामुळे पोरी, तू तुला फक्त तुझ्यासाठी सिद्ध कर. तुझ्या मनगटातली ताकद तुला जाणवण्यासाठीच प्रवास कर. बाकी, देशाचे वाभा'डे' काढणार्‍या यःकश्चित स्त्रीच्या कानाखाली तूच सणसणाती चपराक द्यावीस, ह्यासारखा न्याय झालाच नसता.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments