रंगखेळ

तू कधी माणसांना रंग बदलताना पाहिलं आहेस?

कराड्याचा गुलाबी होताना
गुलाबीचा करडा?
गरजेनुसार
सोयीनुसार

आपल्याला करड्याची दया
गुलाबीचं अप्रूप
आपण देत राहतो प्रतिसाद
बदलत्या रंगांना..
आपल्याला समजून येत नाही
त्यांची गरज,
कळून येत नाही
सोयीस्कर होणारा वापर
कधीतरी कुणीतरी
तो लक्षात आणून देतो आणि

आपण आपली रंगहीनता
दुपटीने जपू लागतो

-बागेश्री

Post a Comment

0 Comments