नियती

काही आयुष्य लिहिलेली असतात. काही लिहिली जातात. नियती स्वतः एखादाच्या हाती लेखणी देते आणि म्हणते "लिही. स्वतःचं आयुष्य स्वहस्ते लिही. मला काही वेगळं वाचायचंय." पण नियती कायम लबाड, लेखणीत निखारे भरते. कागदाला पेन लागताच कागदे जळू जागतात. संधी असते, वेळ असतो, प्राक्तन रेखाटण्याची मुभा असते तरीही
काही आयुष्य धुमसणारी ठरतात.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments