उत्सव

स्वतःला ओढून
वर्तमानात घेऊन यावं आणि
दरडावावं की
थांब, इथेच थांब
सर्वार्थाने जग, हा क्षण!
नीती अनिती
योग्य अयोग्य
सत्य असत्य हा शोध थांबवून
परिपूर्ण जग फक्त हाच क्षण!
वर्तमानाशी असं
एकरूप होताच
येईल जाणवून
की,
बाहेरचा आणि आतला ऋतू
एकजीव झालाय..!

निसर्गाने घेतलंय शोषून आपलं अस्तित्व
बघता बघता ह्या क्षणाचाच ... उत्सव झालाय!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments