मनोरे

काही अनुभव खडखडीतपणे वास्तव समोर आणतात. स्पष्ट. थेट. खरे बोचरे वास्तव. त्या क्षणी त्या अनुभवाची किंमत लाखमोलाची. आपल्याला चिकटलेलं बरं वाईट ह्या अनुभवाने वेगळं होतं. गळून जातं. आपण केवळ सत्य होऊन जातो. ह्याच क्षणी स्वतःला करडेपणे स्वीकारून टाकावं. स्वच्छ नितळ व्हावं आणि व्हावं साक्षीदार आशेचे मनोरे कोसळतानाचे.
             पण, आशेइतकं चिवट दुसरं काहीच नाही. ती अगदी काही काळातच नव्या उमेदीने पुढचा मनोरा बांधायला घेते, नव्या बांधकामाला आपलाही हातभार लागतो. आपण एकच करावं, ठरवून, गुंतवू नये फार आपलं मन, दगड - विटा - वाळूत. मग ढासळणंही पाहता येतं, लांबून, एखाद्या त्रयस्थासारखं.
-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. साक्षीभाव असणं म्हणजे आपल्या आदर्शवादी, स्वप्नाळू जगात प्रखर, ख-या खु-या वास्तवाचे भान ठेवणं. पण साक्षीदार होणं, हे अत्यंत टोकाच्या वास्तवात जगणं. हे जगणं एकांतवासातले आध्यत्मिक जीवन होय.
    गौतमाने एक गोष्ट सांगितली.एक साधक भिक्षु झाला.गौतम आणि इतर भिक्षु चांगल्या रस्त्याने चालायचे, तर हा मुद्दाम काटेकुटे, दगड गोटे असलेल्या रस्त्यावरून चालायचा. बुद्ध म्हणाले, अरे, साक्षीभवातून साक्षीदार जन्माला येत असतो!

    ReplyDelete