पोकळी

आयुष्याची झोळी
खांद्याला अडकवून
गतकाळामध्ये यावं फिरून
आणि
आणाव्या वेचून
सगळ्या
रिकाम्या जागा,
जगता जगता
सुटतच गेलेल्या..

भरल्या झोळीतले तुकडे
समोर पसरवून
एक एक तुकडा
हाती घेऊन,
साकारत जावी
प्रतिकृती,
मनाच्या पोकळीची
अगदी हुबेहूब!

तसंही
सरत्या काळात
हक्काचं काहीतरी
सोबतीला हवंच असतं
किमान, त्यासाठी तरी
आयुष्याची झोळी
खांद्याला अडकवून

गतकाळामध्ये यावं फिरून....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments