भरती

तव स्मृतींच्या
अखंड लाटा
आठवणींना
येता भरती
अनंत मोती
गत काळाचे
अलगद येती
काठावरती...

जरी तुझ्या या
सामर्थ्याने
टाळत जाते
बुजून जाणे
तरीही हळवे
हळवे होते
वाळूवरले
भिजले गाणे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments