पुरावा

जिथे मला तू भेटला होतास
त्या किनाऱ्याशी,
त्यातल्या वाळूत
मी खुपसणार आहे
माझे डोळे
आणि काढणार आहे शोधून
नेमकं काय घडलं होतं
त्या क्षणी की ज्यामुळे
तुझ्या पावलांना
माझ्या दिशेने
साद आली..!!

नक्कीच काही कणांवर
चिकटून राहिला असेल
अबोल पुरावा, अजूनही!

येईन मी त्यांना घेऊन
माझ्या चिमटीत धरून
कारण
त्या चार कणांनी
इतर कुणाचाही
पुरावा होण्याचं टाळलंय 
असं, नुकतंच कळलंय!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments