वलय

स्वतःच्या वलयाने ओतप्रोत भारावलेल्या, स्वतःवरच बेहद्द भाळलेल्या व्यक्तींबरोबर संवाद घडूच शकत नाही. ते आत बसून बाहेर बघत असतात. त्यांच्या वलयाचं अभेद्य कवच त्यांच्याभोवती असं काही बळकट असतं की, बाहेरचं आतवर काहीच जाऊ शकत नाही. त्याउलट आपला प्रत्येक शब्द त्यांच्या वलयाला भिडून आपल्यावरच येऊन आदळतो. त्यामुळे आपल्याला आपलेच शब्द निष्प्रभ वाटायला लागतात! म्हणून अशा व्यक्तींना आपल्या ठेवणीतलं काहीही  सुपूर्द करू नये. शब्दही नाही, मौनही नाही!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments