बुडबुडे

काही शब्द असतात बुडबुडे
हवेत हलके तरंगतात
लोभस गोंडस दिसतात...
प्रकाशकिरण आरपार होताच,
सप्तरंगी हसतात
तना मनाला हरखून  
वेडी भूल पाडतात...
मात्र त्यांना 
सोसत नाही
सत्याचा बोचरा 
नाठाळ वारा
तो लागताच
टच्चकन फुटतात
मातीमध्ये जिरतात...
कृतीची जोड नसलेले
सगळेच शब्द,
फक्त आणि फक्त
बुडबुडे असतात...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments