आयुष्याचं पुस्तक

प्रत्येक क्षणांची अक्षरे होऊन उमटत आहेत,
आयुष्याची पानं सरसर सरसर भरत आहेत!
आपण केवळ मागचं पान
उघड्या डोळ्याने पाहू शकतो
नवा मजकूर उमटताना
सावध राहून लिहू शकतो..

तसंही शेवटी

प्रत्येकाचंच होणार आहे,
एक पुस्तक!
सांगेल जे जगाला
गोष्ट स्वतःची, निरंतर
थोडी चूक थोडी बरोबर
तरी देखील सविस्तर...
म्हणून आपण फक्त
इतकंच करावं,
जगाच्या लक्षात राहील असं
एक पान भरावं.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments