न जाणो कुठूनी तुझी साद येते

न जाणो कुठूनी तुझी साद येते 
कुठे ही मला खेचती पावले?

कुणी ना जिथे आपुले ऐकण्याला,
तिथे नेमकी चालली पावले..

मनाला कितीदा पुन्हा तेच सांगू
विसरली तुला, शबनमी पावले...!

कुणाला कधीची किती शोधती ही
न दमती न थकती कशी पावले?

तसा एकट्याने उभा जन्म गेला
अता सोबती मागती पावले

-बागेश्री

Post a Comment

0 Comments