स्थैर्य

अत्यानंदाने डोळ्याला डोळा लागला नाही असे कितीतरी सख्खे क्षण येऊन जातात आयुष्यात पण ते सारवत नाहीत दु:खांच्या सावत्र रात्री! आनंद आणि दु:ख वेगळाले. त्यांची प्रकृती भिन्न, नियत वेगळी. म्हणूनच त्यांचं स्वागत करण्याची, आपलीही पद्धत वेगळी. चुकवू म्हणून त्यांना चुकवता येत नाही. ते येतात. नेमाने. चक्राकार पद्धतीने. हक्काने, अगदी पाहुणे आल्यासारखे. रुबाबात! सगळेच पाहुणे कुठे आपल्याला प्रिय असतात? काहींचं करतोच की आपण, निमूट, कर्तव्य असल्यासारखं. खरं तर दोघांकडेही समान त-हेने पाहण्याची नजर येते तेव्हा म्हणावं, जगण्याला स्थैर्य लाभलं म्हणून....
-बागेश्री

Post a Comment

0 Comments