Insecurity

कधी कधी
आपल्याही नकळत
वागून जातो आपण
विचित्र, असमर्थनीय!
आणि स्वतःला स्वतःपुढे
निर्दोष सिद्ध करायला
देत बसतो त्या
वागण्याची लक्ष लक्ष समर्थनं!
माझ्या नाही
समोरच्याच्या
काळजीपोटी भल्यासाठी
प्रेमाकरता मायेपोटी
असेन असा वागलो!
पाहिलेत चार जास्तीचे
पावसाळे नि उन्हाळे
चुकतील कसे माझ्या
या अंत:करणामधले
उमाळे?
खरं तर तेव्हा
आली असते उकळी
आतल्या खोल
असुरक्षिततेच्या भावनेला,
वर मात्र जगाला
लावतो आपण पहायला
प्रेमाचा फसवा देखावा अन्
कोटी कोटी बुडबुडे
मायेच्या
सो कॉल्ड
उमाळाल्या...!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments