मन राधा राधा झाले

मन राधा राधा झाले
गोकुळात चालत गेले
यमुनेच्या काठावरती
पाऊल उमटले ओले

यमुनेला पटली ओळख
थरथरला मधुर शहारा 
ती म्हटली, युगायुगांचा
आलीस करूनी फेरा?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments