कर्ण ओळखीचा वाटतो..

कर्ण ओळखीचा वाटतो...
कवच कुंडलं गमावलेला... ठरवून हरलेला.
सामान्य माणसाच्या फार जवळ जाणारा वाटतो.

तुमचा आत्मविश्वास काढून घेतला, वागण्याच्या पद्धती बदलवून टाकल्या, की तुमचं वेगळेपण काढून घेतल्यासारखंच आहे. आपल्याला निसर्गदत्त मिळालेल्या गोष्टीच आपलं "गार्ड" आहेत हे न समजून घेताच आपणही उदार मनानं उतरवतो सारं...

आता रणांगण तेच असतं, योद्धेही!
फक्त ज्या जोरावर मिजास असते ती कवचकुंडलं आपण डोळे झाकून विश्वासलो त्याच्या सुपूर्द असतात..

सारं आकळून कर्ण होणारा सामान्य माणूस जवळचा वाटतो
तुमच्या आमच्यात दिसतो.
ओळखीचा वाटतो...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments